भजनी मालिका
← भजनांकडे परत

अष्टोत्तरशें वेळ समाधि निश्चळ । पूर्वीं तुझें स्थळ वहनाखालीं

ashtottarashen vel samadhi nishchal | purvin tujhen sthal vahanakhalin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अष्टोत्तरशें वेळ समाधि निश्चळ । पूर्वीं तुझें स्थळ वहनाखालीं ॥१॥ उठविला नंदी शिवाचा ढवळा । उघडिली शिळा विवराची ॥२॥ आसन आणि धुनि मृगछालावर । पाहाती ऋषीश्वर वोसंडोनि ॥३॥ बा माझी समाधि पाहिली जुनाट । केवळ वैकुंठ गुह्यगोप्य ॥४॥ नामा म्हणे देवा पुरातन स्थान । ऐसें नारायणें दावियेलें ॥५॥