भजनी मालिका
← भजनांकडे परत

अष्टोत्तरशें तीर्थें सारीं । ओघें आलीं आळंकापुरीं

ashtottarashen tirthen sarin | oghen alin alankapurin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अष्टोत्तरशें तीर्थें सारीं । ओघें आलीं आळंकापुरीं । वाद्यें वाजताती गजरीं । कीर्तन लहरी अमृताची ॥१॥ जैसा कस्तुरीचा सुगंधु । अनुभवी न म्हणतीच बद्धु । तैसा औटपिठाचा नादु । आठवी गोविंदु आवडीनें ॥२॥ बौद्ध अवतार चक्रपाणि । सत्रावी कळा माय रुक्मिणी । जाणत असे अंतःकरणीं । भक्त इच्छा ॥३॥ भावें विठठलें केली गोष्टी । ज्ञानदेवें अपूर्व इच्छिलें पोटीं । जावें उठाउठीं । समुदायेंसी ॥४॥