भजनी मालिका
← भजनांकडे परत

असतां सुखरुप मातापिता वृद्ध । वैकुंठा स्वानंदे निघोनी गेलीं

asatan sukharup matapita vruddha | vaikuntha svanande nighoni gelin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
असतां सुखरुप मातापिता वृद्ध । वैकुंठा स्वानंदे निघोनी गेलीं ॥१॥ संसाराची चिंता नाहीं विठठलासी । अखंड वृत्तीसी समाधान ॥२॥ जालें वर्तमान ऐकिलें सिदोपंतीं । परम तेणें चित्तीं खेद केला ॥३॥ येउनि परामर्ष घेतला दोघांचा । म्हणे सांभाळ तुमचा करितो देव ॥४॥ उदासीन वृत्ति तुमची सर्वकाळ । पदार्थ सकळ पाहिजे तो ॥५॥ दया करोनि मज आतां सांभाळावें । आळंकापुरीं राहावें सुखरुप ॥६॥ पुत्रसंतती कांही होईल तुम्हांसी । मग येईल चित्तासी तें करा सुखें ॥७॥ मग मानुनी वचन विठठलें तयाचें । म्हणे हें देवाचे करणें हो ॥८॥