भजनी मालिका
← भजनांकडे परत

अरे नाम्या काये केलें । कासया धोंडयाशीं कोंडिलें

are namya kaye kelen | kasaya dhondayashin kondilen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अरे नाम्या काये केलें । कासया धोंडयाशीं कोंडिलें ॥१॥ उदीम बरावा फळा आला । हरविलें भांडवला ॥२॥ संसारिक चतुर बहु । मातीसमान घेसी गहूं ॥३॥ नामा म्हणे दामासेठी । माझी ऐकावी हे गोष्टी ॥४॥