भजनी मालिका
← भजनांकडे परत

अरे मना तूं मर्कटा । पापिया चांडाळा लंपटा । परद्वार हिंडसी सुनटा । अरे पापी चांडाळा

are mana tun markata | papiya chandala lampata | paradvar hindasi sunata | are papi chandala

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अरे मना तूं मर्कटा । पापिया चांडाळा लंपटा । परद्वार हिंडसी सुनटा । अरे पापी चांडाळा ॥१॥ अरे तुज पापावरी बहु-गोडी । देवाधर्मीं नाहीं आवडी । तेणें न पावसी पैल थडी । कर्म बांधवडी पडिसील ॥२॥ अरे तूं अभिलषिसी परमारी । तेणें सिद्ध-पंठ राहेल दुरी । जवळी येईल यमपुरी । आपदा पावसील ॥३॥ आतां तुज वाटतसे गोड । अंतकाळी जाईल जड । महादोष येति सुखा आड । करितील कईवाड यमदूत ॥४॥ माझें शिकविलें नाइ-कसी । आतां सांगेम बळिया केशवासी । धरूनि नेईल वैकुंठासी । चरणीं जडसी ह्मणे नामा ॥५॥