भजनी मालिका
← भजनांकडे परत

अरे मना शोक करिसी किती । हे तंव वांयां धनसंपति । आयुष्य भविष्य नाहीं तुझिये हातीं । हें अवघें अंतीं जायजणें

are mana shok karisi kiti | he tanv vanyan dhanasampati | ayushya bhavishya nahin tujhiye hatin | hen avaghen antin jayajanen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अरे मना शोक करिसी किती । हे तंव वांयां धनसंपति । आयुष्य भविष्य नाहीं तुझिये हातीं । हें अवघें अंतीं जायजणें ॥१॥ एक अर्बुद साठीं कोटि देखा । तीस लक्ष दहा सहस्त्र लेखा । सात शतें नवमास मापा । तया हिरण्यकश्यपा काय झालें ॥२॥ चौदा चौकडय लंकानाथा । नव्याण्णव सहस्त्र राया दशरथा । तेही गेले स्वर्गपंथा । मागें सर्वथा नुरलेचि ॥३॥ चौदा कल्प मार्कंडेया पडे । तैं लोमहर्षणाचा एक रोम झडे । बकदालभ्याचे पुरे निमिषें मोडे । गेले येवढे अरे मना ॥४॥ बकदालभ्याचे पुरे निमिषें । तें वटहंसाचें उपडे पिच्छ । तयासि होता मत्युप्रवेश । तो एक श्वास भृंशुडीचा ॥५॥ मरणांत पुरे भृंशुडीचा । तैं एक दिवस कूर्माचा । नामा वि-नवी केशवाचा । वेगीं विठोबाचा पंथ धर ।\६॥