भजनी मालिका
← भजनांकडे परत

आपुले रूपीं मज लपवीं निरंतरीं । समाये भीतरीं आड राहे

apule rupin maj lapavin nirantarin | samaye bhitarin ad rahe

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आपुले रूपीं मज लपवीं निरंतरीं । समाये भीतरीं आड राहे ॥१॥ परि तुज मज असावा संबादू । भ्रांति मायाबाधु करी ॥२॥ काम क्रोध लोभ दंभ मद मछर । हे वैरी अपार मारी माझे ॥३॥ नामा म्हणे आम्हीं जन्माजन्मांतरींचे । पोसणें घरींचे सदा तुझें ॥४॥