भजनी मालिका
← भजनांकडे परत

अपराधाच्या कोडी हीच माझी जोडी । पावनत्व प्रौढी नाम तुझें

aparadhachya kodi hich majhi jodi | pavanatva praudhi nam tujhen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अपराधाच्या कोडी हीच माझी जोडी । पावनत्व प्रौढी नाम तुझें ॥१॥ द्रौपदी संकटीं वस्त्रें पुरविलीं । धांवा त्वां घेतली गजेद्रासी ॥२॥ उपमन्यालागीं आळी पुराविली । अढळपदीं दिधली वस्ती ध्रुवा ॥३॥ नामा म्हणे करा करुणा केशवा । तूं माझा विसावा पांडुरंगा ॥४॥