भजनी मालिका
← भजनांकडे परत

आणूनि सुरभि करी अभिषेक । येती सकळिक मरुद्नण

anuni surabhi kari abhishek | yeti sakalik marudnan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आणूनि सुरभि करी अभिषेक । येती सकळिक मरुद्नण ॥१॥ सुरवरांची दाटी करिती नमस्कार । होतसे अपार पुष्पवृष्टी ॥२॥ वेदमंत्रघोष ऋषि करिताती । अप्सरा नाचती थैयथैयां ॥३॥ नारद तुंबर गंधर्व गायन । वर्णिताती गुण कृष्णाजीचे ॥४॥ यथा-विधि इंद्र पूजी विश्वंभरा जोडोनियां करा उभा राहे ॥५॥ आज्ञा घेऊनियां जाय स्वस्थळासी । येती गोकुळासी सकळीक ॥६॥ चरित्र जो कोणी उच्चारील वाचे । जळती पापाचे पर्वत हे ॥७॥ नामा ह्मणे ऐसें सांगतसे शुक । सूत पुराणिक शौनकासी ॥८॥