भजनी मालिका
← भजनांकडे परत

अंतरीं आवेश धरूनि कामाचा । लटकी जल्पे वाचा शब्द ज्ञानें

antarin avesh dharuni kamacha | lataki jalpe vacha shabda dnyanen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अंतरीं आवेश धरूनि कामाचा । लटकी जल्पे वाचा शब्द ज्ञानें ॥१॥ बोलाचे पैं मांडे क्षीर घारी अन्न । तेणें समाधान केविं होय ॥२॥ बोलिल्यासारिखें न करी पाम र । वृथाचि कुरकुर वाढविली ॥३॥ नाहीं जीव तया प्रेता आलिंगन । तैसें तें श्रवण केल्या होय ॥४॥ नामा ह्मणे त्याच्या संगे स्थिति दुषे । झाला लाभ नासे तेथें आतां ॥५॥