भजनी मालिका
← भजनांकडे परत

अनिर्वाच्य ब्रह्म निगम ह्मणती शिणले वेवादति अठरा साही

anirvachya brahma nigam hmanati shinale vevadati athara sahi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अनिर्वाच्य ब्रह्म निगम ह्मणती शिणले वेवादति अठरा साही ॥१॥ तें हें पुंडलिकें चोहोंटा उभें केलें । भावें भुलविलें पंढरीये ॥२॥ घ्यारे घ् यारे तह्मी कैवल्याचेम पीक । देतो पुंडलीक सकळ जीवां ॥३॥ उपनिषदांचें मथितार्थ जें साराचें यथार्थ । तो हा पंढरीनाथ प्रगट जगीं ॥४॥ हरिहर विरंचि त्रिमूर्ति हाची । माउली दीनांची लोभा पर ॥५॥ जो श्रवणांचा श्रवण नयनांचा नयन ज्ञानाचा दर्पण दृष्ट होय ॥६॥ आदि मध्यें अंतीं व्यापक सर्वांभूतीं । तो हा झाला व्यक्ति भक्तिभावें ॥७॥ सदा चित्ता आनंदघन परिपूर्ण । कारणें महा कारण प्रभा हेचि ॥८॥ चित्ता चेतविता बुद्धीतें पाळिता । मनादि चाळिता इंद्रियांसी ॥९॥ तो या चराचरीं जीवलग सोइरा । ह्मणोनि अनुसरा पांडुरंगा ॥१०॥ नामा ह्मणे काया वाचा मनें त्याचें । नाम जपा कैचें जन्ममरण ॥११॥