भजनी मालिका
← भजनांकडे परत

अंगीं हो पैं शांती । दया क्षमा सर्वांभूतीं

angin ho pain shanti | daya kshama sarvambhutin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अंगीं हो पैं शांती । दया क्षमा सर्वांभूतीं ॥१॥ जेथें जाऊन पाहे देवा । ब्रम्हादिक करिती सेवा ॥२॥ आवडी असे पैं कीर्तनीं । लवे संतांचे चरणीं ॥३॥ जैसी दया पुत्रावरी । तेंचि पाहे चराचरीं ॥४॥ बहु अपराध केला । म्हणे जनी तो रक्षिला ॥५॥