भजनी मालिका
← भजनांकडे परत

अनाथाचा नाथ भक्तांचा कैवारी । पुराणीं हे थोरी ऐकियली

anathacha nath bhaktancha kaivari | puranin he thori aikiyali

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अनाथाचा नाथ भक्तांचा कैवारी । पुराणीं हे थोरी ऐकियली ॥१॥ ऐकोनियां कीर्ति आलों तुजपाशीं । निवारी दुःखासी केशिराजा ॥२॥ त्रितापें तापलें दुःखें आहाळलों । कासाविस जालों दायासिंधू ॥३॥ तुजवीण आतां कोणातें मी सांगूं । तोडि हा उद्वेगु नारारणा ॥४॥ नामा म्हणे आतां नको पाहूं अंत । उद्धरीं त्वरित पांडुरंगा ॥५॥