भजनी मालिका
← भजनांकडे परत

अनंता जन्मीचें चुकवीं सांकडें । काय मी बापुडें वानुं कैसें

ananta janmichen chukavin sankaden | kay mi bapuden vanun kaisen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अनंता जन्मीचें चुकवीं सांकडें । काय मी बापुडें वानुं कैसें ॥१॥ सगुन गुणाची वोललिसे मूर्ति । राहो माझे चित्तीं निरंतर ॥२॥ माझा मीच जालों सकळ व्यापारी । संसारा बाहेरी काढी कोण ॥३॥ नामा म्हणे मज नको गोवूं आशा । पावन परेशा केशिराजा ॥४॥