भजनी मालिका
← भजनांकडे परत

आनंदें खेळत । राम नडी कृष्णनाथ

ananden khelat | ram nadi krushnanath

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आनंदें खेळत । राम नडी कृष्णनाथ ॥१॥ गडी ह्म-णती रामा । ताडफळें देई आत्मां ॥२॥ सकळ मिळोनि । आले धेनूकांचे वनीं ॥३॥ वृक्ष खालवोनी । फळें पाडिलीं मेदिनीं ॥४॥ येत धांवोनी असुर । करी तयाचा संहार ॥५॥ भक्तांचा अंकित । नामा ह्मणे कृष्णनाथ ॥६॥