भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्हावरी कांरे धरियेला राग । काय तुझें सांग आम्हीं केलें

amhavari kanre dhariyela rag | kay tujhen sang amhin kelen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आम्हावरी कांरे धरियेला राग । काय तुझें सांग आम्हीं केलें ॥१॥ रडतसों आम्हीं मारितसों हांका । विश्वाच्या जनका नायिकसी ॥२॥ कामाग्नीनें आम्हीं जळतों सकळ । करावें शीतळ अधरामृतें ॥३॥ नामा म्हणे देईं एक वेळ भेटी । तुजसाठीं कष्टी फार होती ॥४॥