भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्हांपासीं काय मागसी तूं देवा । नाहीं भक्तिभाव भांडवल

amhampasin kay magasi tun deva | nahin bhaktibhav bhandaval

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आम्हांपासीं काय मागसी तूं देवा । नाहीं भक्तिभाव भांडवल ॥१॥ भांडवल गांठीं देखोनि साचारा । सुदाम्याची फार पाठ घेसी ॥२॥ घेसी सोडुनियां पोहे मुठीभरा । हिडसावल्या करा नामा म्हणे ॥३॥