भजनी मालिका
← भजनांकडे परत

आलिया संसारीं आत्माराम मुखीं । घेतलिया सुखी त्रिभुवनीं

aliya sansarin atmaram mukhin | ghetaliya sukhi tribhuvanin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आलिया संसारीं आत्माराम मुखीं । घेतलिया सुखी त्रिभुवनीं ॥१॥ जपोनियां नाम आपुलेंचि आधीं । मग सोहंसिद्धि सर्व साधे ॥२॥ सर्व हरी मग नाहीं दुजा भाव । प्रापंचिक गर्व दिसेचिना ॥३॥ नामदेव म्हणे सर्वही साधनें । भासे जन वन परब्रह्म ॥४॥