भजनी मालिका
← भजनांकडे परत

आलिंगन पडिलें दृढ । मिठी पडिली न सुटे गूढ

alingan padilen drudh | mithi padili na sute gudh

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आलिंगन पडिलें दृढ । मिठी पडिली न सुटे गूढ । पुंडलिक म्हणे मज चाड । या विठठल चरणाची ॥१॥ तुझे दरुषण माझा लाभ । जैसा ज्ञानदेवावरी लोभ । नामयावरी स्वयंभ । तैसाचि करी विठठला ॥२॥ नामदेवेम आळंगुनी प्रीती । शिर चरणावरी अवचितीं । ज्ञानदेवाच्या ठेवी पुढतीं । म्हणे धन्य क्षितीं मी एक ॥३॥ पुंडलिक म्हणे नामया । धन्यधन्य तुझा थाया । क्षितीम आणिलें वैकुंठराया । ज्ञानदेवाचेनि स्मरणें ॥४॥ धन्य युगानयुगीं तुम्ही । धन्य देखिलें तीं आम्ही । धन्य आळंकापुर जन्मीं । उपजोनी जो देखेल ॥५॥ पंढरीहुनी हें मूळपीठ । जुनाट पैं वैकुंठ । पूर्वीं येथेम होते नीळकंठ । ब्रह्मविष्णुरुद्रइंद्र ॥६॥ तें हें शिवक्षेत्र प्रत्यक्ष । पूर्वे मातुलिंग साक्ष । तेथेंही केशव प्रत्यक्ष । चतुर्भुजरुपें असे ॥७॥ दक्षिण पुण्येश्वर देवो । पुण्यस्थळ महादेवो । मूळपीठीं नागेंद्रीं पाहा हो । त्रिवेणीरुपीं वाहातसे ॥८॥ पश्चिमे इंदोरिये देवो । ब्रह्मेश्वर उत्तम ठावो । उत्तरे सिद्धेश्वर देवो । खेटकग्रामीम भागीरथी ॥९॥ मध्यस्थळीं हे इंद्रायणी । सरसी भागीरथी वाहिनी । सिद्धेश्वर शोभे स्थानीं । ज्ञानेदेवो सहित ॥१०॥ ऐसिये दक्षिण वाहिनीसी । स्नान घडताम अहर्निशीं । कोटि तीर्थें प्रयाग काशी । प्रसन्न होती हरिहर ॥११॥ ऐसिये तीर्थीं देवा । समाधि दिधली ज्ञानदेवा । पुंडलिक विनवितसे केशवा । धन्य भाग्य नामयाचें ॥१२॥