भजनी मालिका
← भजनांकडे परत

आळेनो संसारा उठा वेगें चला । जिवलग विठ्ठला मे-ठीलागीं

aleno sansara utha vegen chala | jivalag viththala me-thilagin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आळेनो संसारा उठा वेगें चला । जिवलग विठ्ठला मे-ठीलागीं ॥१॥ दुर्लभ मनुष्य जन्म व लभेरे मागुता । लाहो घ्या स-र्वथा पंढरीचा ॥२॥ भावें लोटांगण पाला महाद्वारीं । होईल बो-हरी त्रिविध तापा ॥३॥ श्रीमुखाची वास पहा घणीवरी । आठवी अंतरीं घडिये घडिये ॥४॥ शुद्ध सुमनें कंठीं घाला तुळशीमाळा । तनमन ओवाळा चरणांवरूनि ॥५॥ नामा ह्मणे विठो अनाथा को-वसा । पुढती गर्भवासा येऊं नेदी ॥६॥