भजनी मालिका
← भजनांकडे परत

आले गोकुळासीं । हर्ष न माये मानसीं

ale gokulasin | harsha na maye manasin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आले गोकुळासीं । हर्ष न माये मानसीं ॥१॥ नंदें गर्गातें देखिलें । पूजा स्तवनीं तोषविलें ॥२॥ भूतभविष्यवर्तमान । तुह्मां कळती हो संपूर्ण ॥३॥ पाहा सामुद्रिक लक्षण । याचें कांहीं सांगा चिन्ह ॥४॥ बोले तेव्हां तो नंदाशीं । झणीं कळेल कंसासी ॥५॥ रोहिणीनंदादि वैसती । ऐकावया जातक चित्तीं ॥६॥ घालू-नियां मंगलस्नान । आरंभीं पुण्याहवाचन ॥७॥ ऐसी वदे शुकवाणी । नामा ह्मणे ऐका कानीं ॥८॥