भजनी मालिका
← भजनांकडे परत

आला जगदीश्वर । त्याचेम भरलें भांडार

ala jagadishvar | tyachem bharalen bhandar

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आला जगदीश्वर । त्याचेम भरलें भांडार ॥१॥ सुशो-भित दिसे मही । दोन लक्ष दिधल्या गायी ॥२॥ तिळ तांदूळ पर्वत । द्रव्यें वांटी अगणित ॥३॥ एक जाती एक येती । ओझें उचलितां कुंथती ॥४॥ भाट वर्णिताती । नामा ह्मणे ज्याची कीर्ति ॥५॥