भजनी मालिका
← भजनांकडे परत

आजि आवतणें संतांचें । भोजन जालें हरिनामाचें

aji avatanen santanchen | bhojan jalen harinamachen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आजि आवतणें संतांचें । भोजन जालें हरिनामाचें ॥१॥ आम्ही जेविलोंज जेविलों । नामामृतें पूर्ण धालों ॥२॥ बरवी परावडी वैष्णवांची । आवडी पुरली हरिनामाची ॥३॥ नामा केशवाचा म्हणे । माझे ह्रदयीं नारायण ॥४॥