भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसें तीर्थ कोणी दाखवा सुलभ । जेथें समारंभ हरि-कथेचा

aisen tirtha koni dakhava sulabh | jethen samarambh hari-kathecha

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ऐसें तीर्थ कोणी दाखवा सुलभ । जेथें समारंभ हरि-कथेचा ॥१॥ तें एक पंढरी विख्यात त्रिभुवनीं । सकळां शिरोमणी चंद्रभागा ॥२॥ ऐसें तीर्थ कोणी दाखवा सुखरूप । जेथें त्रिविध ताप हारपती ॥३॥ ऐसें तीर्थ कोणीं दाखवा सुंदर । गरुड टक्केभार विराजती ॥४॥ ऐसें तीर्थ कोणीं दाखवा निर्मळ । जेथें नासे मळ दुष्टबुद्धि ॥५॥ नामा म्हणे संतजनाचें माहेर । गातां मनोहर गोड वाटे ॥६॥