भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसें तीर्थ कोणी दाखवा गोमटें । जेथें प्रत्यक्ष हें भेटे परब्रह्म

aisen tirtha koni dakhava gomaten | jethen pratyaksha hen bhete parabrahma

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ऐसें तीर्थ कोणी दाखवा गोमटें । जेथें प्रत्यक्ष हें भेटे परब्रह्म ॥१॥ कोठें ऐसें क्षेत्र आहे त्रिभुवनीं । सकळां शिरोमणि चंद्रभागा ॥२॥ ऐसें तीर्थ कोणी दाखवावें एक । देखतांचि सुख पावे मन ॥३॥ ऐसें तीर्थ कोणी दाखवा साजिरें । सदा प्रेमपुरें वोसंडत ॥४॥ ऐसें तीर्थ कोणी दाखवा सुलभ । जेथें समारंभ हरिकथेचा ॥५॥ ऐसें तीर्थ कोणी दाखवा निर्मळ । परब्रह्म केवळ सकळां जीवां ॥६॥ नामा म्हणे आह्म दीनांचें माहेर । धन्य पंढरपुर गीतीं गातां ॥७॥