भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसें परियेसिलें विठठलें । तंव रुक्मिणीनें विनविलें

aisen pariyesilen vithathalen | tanv rukmininen vinavilen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ऐसें परियेसिलें विठठलें । तंव रुक्मिणीनें विनविलें । याचें करिजो जी म्हणितलें । हाकारिजो पुंडलिका ॥१॥ धन्य धन्य धरातळीं । वोळले वोळले वनमाळी । वैष्णवी पिटली टाळी । जयजय शब्दें करुनियां ॥२॥ गरुडासी सांगे केशव । कैसा भेटे यासी ज्ञानदेव । पुंडलिकासी जाऊनी सर्व । वृत्तांत सांगे येथींचा ॥३॥ तेणें नमस्कारुनि हरी । निघाला पक्षाच्या फडात्कारीं । भेटला पुंडलिका झडकरी । यथाविधि सांगितलें ॥४॥ पुंडलिकें विस्मित चित्तीं । म्हणे धन्य धन्य ज्ञानमूर्ती । ज्या कारणें वैकुंठपती । आळंकापुरीसी गेले ॥५॥ धन्य धन्य विठोबाचे चरण । धन्य धन्य माझे नयन । धन्य नामा रुपीं संपन्न । विष्णु भक्त सखा माझा ॥६॥ मग गरुडासि पूजिलें । ज्ञानदेवा हाकारिलें । दिव्य विमानीं बैसविलें । चला म्हणितलें आळंकापुरीसी ॥७॥ नामा असे खेद करीत । केशव तयासी संबोखित । तुम्हा दोघांचा येकांत । माझेनि संगें पुरेल ॥८॥