भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसें नित्यानंदभरित क्रमिताती मार्गु । ह्रदयीं तो अनुरागु आवडीचा

aisen nityanandabharit kramitati margu | hradayin to anuragu avadicha

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ऐसें नित्यानंदभरित क्रमिताती मार्गु । ह्रदयीं तो अनुरागु आवडीचा ॥१॥ प्रेमें वोसंडत करितो स्वहितगोष्टी । द्राविती कसोटी अनुभवाची ॥२॥ बाप तें सुख वृष्टि होतसे अनिवार । ब्रह्मरसें पूर वोसंडत ॥३॥ ज्ञानदेव म्हणे परियेसी नामया । अद्वैत आत्मया प्रेममूर्ती ॥४॥ भक्तिभाग्य तुवां जोडिलें अविनाश । सांग पां सविलास मार्ग त्याचा ॥५॥ कैसा तो साधावा सांग भजनविधि । कैसी नमनबुद्धि सत्वशील ॥६॥ कैसा निर्विकार ध्यानाचा प्रकार । हा सर्व विचार सांगे मज ॥७॥ कैसें तें श्रवण कैसे तें मनन । कैसें निजध्यासन दृढ होय ॥८॥ कवण तें भक्ति कवण तें धृति । कवण तें विश्रांति दावी मज ॥९॥ बहु उत्कंठित या सुखा करणें । तें मज पारणें करवीम आजी ॥१०॥ सांगे हा अनुभवो साधन उपावो । विनवी ज्ञानदेवो नामयासी ॥११॥