भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसें बहुत काळ लोटलियावरी । पुण्याची सामोग्रीं हारपली

aisen bahut kal lotaliyavari | punyachi samogrin harapali

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ऐसें बहुत काळ लोटलियावरी । पुण्याची सामोग्रीं हारपली ॥१॥ मरोनियां जन्म हरणाचा पावला । पतिव्रता झाल्या कुरंगिणी ॥२॥ प्रारब्धाचा भोग सुटेना कोणासी । केलीं जैसीं तैसीं घ्यावीं फळें ॥३॥ नामा म्हणे देव कृपा करील जरी । सुटेना तोंवरी भोग खरा ॥४॥