भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसें असतां तो सरूम आला काळ । प्रारब्धाचें बळ कैसें पाहा

aisen asatan to sarum ala kal | prarabdhachen bal kaisen paha

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ऐसें असतां तो सरूम आला काळ । प्रारब्धाचें बळ कैसें पाहा ॥१॥ हिंडता हिंडता फार कष्टि झाला । दृष्टिस तयाला न पडे कांहीं ॥२॥ कडे दरी मोठया पर्वताचे वरी । रिघोनियां करी नाना युक्ती ॥३॥ झाली सांजवेळ न मिळे आमीष । होऊनि उदास राहिलासे ॥४॥ नाना ह्मणे मग काय त्यानें केलें । ऐकावें निश्चळें साधूजनीं ॥५॥