भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसे सुखरुप दोघे चालताती मार्गीं । परी चित्त पांडुरंगीं नामयाचें

aise sukharup doghe chalatati margin | pari chitta pandurangin namayachen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ऐसे सुखरुप दोघे चालताती मार्गीं । परी चित्त पांडुरंगीं नामयाचें ॥१॥ क्षणाक्षणा वास परतोनी पाहे । वियोग न साहे पंढरीचा ॥२॥ म्हणे कां गा केशीराजा मोकलिलें मातें । न येसीच सांगातेम सांभाळीत ॥३॥ चिंतातुर थोर पडिलों ये परजनीं । न दिसे माझे कोणी जिवलग ॥४॥ फुटोनी हदय होती दोन्ही भाग । बहु मज उद्वेग वाटताती ॥५॥ तूं माझी जननी तूं माझा जनिता । तूं बधु चुलता पंढरीराया ॥६॥ इष्टामित्र तूंचि तूंचि गणगोत । तूंचि कुळदैवत आवडतें ॥७॥ तूंचि माझें व्रत तूंचि माझें तीर्थ । तूंचि धर्म अर्थ काम देवा ॥८॥ तूंचि ज्ञानजक्षु तूंचि माझा लक्षू । तूंचि माझा साक्षु स्वभावासी ॥९॥ साच कीं लटिकें हें माझें बोलणें । तुजवांचुनि जाणें कवण दुजा ॥१०॥ नामा म्हणे आपुलें अनाथ सांभाळीं । येऊनी ह्रदयकमळीं राहे माझ्या ॥११॥