भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐकावें चरित्र परीक्षितिराया । बरोबरी जाया एक असे

aikaven charitra parikshitiraya | barobari jaya ek ase

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ऐकावें चरित्र परीक्षितिराया । बरोबरी जाया एक असे ॥१॥ तोडोनियां पुष्पें करी अलंकार । घालीत श्रीधर तिजवरी ॥२॥ नये क्षणभरी योगियांचे ध्यानीं । घालितसे वेणी आवडीनें ॥३॥ वंदियेली शिवें चरणींची गंगा । करीतसे भांगा नीट तीच्या ॥४॥ गोपिकांच्या वेषें प्रगटल्या श्रुती । गुह्य हें तुजप्रती सांगितलें ॥५॥ घेवोनियां तिसी गेला कुंजवना । वज्रांकुश चिन्हा उमटती ॥६॥ गोपिकांचा मेळा येतसे तांतदी । युगाऐसी घडी झाली तयां ॥७॥ नलगेची शोध शीणती सकळा । न जाती गोकुळा नामा ह्मणे ॥८॥