भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐकतां वचन मानेलें तयासी । पुढें कल्पनेसी ठाव नाहीं

aikatan vachan manelen tayasi | pudhen kalpanesi thav nahin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ऐकतां वचन मानेलें तयासी । पुढें कल्पनेसी ठाव नाहीं ॥१॥ तेथें म्यां मागावें हें कांहीं न कळे । निवतील डोळे दर्शनानें ॥२॥ परी तया भेटी न्यावें कांहींबाहीं । परंतु तें नाहीं लेश घरीं ॥३॥ नामा म्हणे द्विज वांच्छी दरुषण । रिकाम्या हातानें जातां लाजे ॥४॥