भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐका पंढरीचें महिमान । राउळें तितुकें प्रमाण । ते-थील तृण आणि पाषाण । तेहि देव जाणावे

aika pandharichen mahiman | raulen tituken praman | te-thil trun ani pashan | tehi dev janave

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ऐका पंढरीचें महिमान । राउळें तितुकें प्रमाण । ते-थील तृण आणि पाषाण । तेहि देव जाणावे ॥१॥ ऐसी पंढरी मनीं ध्याती । त्यांसी तिहीं लोकीं गति । ते आनिका तीर्था जाती । तीं वंदिती तयांसी ॥२॥ वाराणसी चालिजे मासा । गोदावरी एक दि-वसा । पंढरी पाऊल परियेसा । ऐसा ठसा नामाचा ॥३॥ ऐसें शं-कर सांगे ऋषीं जवळी । सकळ तिर्थें माध्यानळीं । येती पुंड-लीकाजवळी । करिती अंघोळी वंदिती चरण ॥४॥ ऐसेनि तिर्थीम पाप झडे । असस्य बोलतां जिव्हा झडे । नाम विनवी संतांपुढें । पंढरी पेठ वोसंडावी ॥५॥