भजनी मालिका
← भजनांकडे परत

आहे त्यांचे मनीं करावें आगमन । घेतील मागुन तुजपाशीं

ahe tyanche manin karaven agaman | ghetil magun tujapashin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आहे त्यांचे मनीं करावें आगमन । घेतील मागुन तुजपाशीं ॥१॥ त्यावेळीं तुम्ही व्हाल जी बेभान । द्याल जी काढोन संतापासीं ॥२॥ खादल्या जेविल्याचें राखावें स्मरण । तुला माझी आण पांडुरंगा ॥३॥ चालविला लळा पुरविली आवडा । आतां कां दगडा जड जालों ॥४॥ कां माझी चिंता सांडिली अनंता । संताहातीं देतां हरुष वाटे ॥५॥ नामा म्हणे काये करिसी अमंगळ । अडचणी राउळामाजीं जाली ॥६॥