भजनी मालिका
← भजनांकडे परत

“अग्नि जाळी तरी न जळे प्रल्हादु। हृदयी गोविंदु म्हणोनिया

“agni jali tari na jale pralhadu| hrudayi govindu mhanoniya

रचनाकार: संत जगमित्र · अभंग
“अग्नि जाळी तरी न जळे प्रल्हादु। हृदयी गोविंदु म्हणोनिया॥ अग्नि जाळी तरी न जळती गोपाळू। हृदयी देवकीबाळू म्हणोनिया॥ अग्नि जाळी तरी न जळती पांडव। हृदयी वासुदेव म्हणोनिया। अग्नि जाळी तरी न जळे बिभिषणाचे घर। हृदयी सीतावर म्हणोनिया।”