भजनी मालिका
← भजनांकडे परत

अग्नि जाळी तरी न जळे प्रल्हादु। हृदयी गोविंदु म्हणोनिया

agni jali tari na jale pralhadu| hrudayi govindu mhanoniya

रचनाकार: संत जगमित्र · अभंग
अग्नि जाळी तरी न जळे प्रल्हादु। हृदयी गोविंदु म्हणोनिया॥ १॥ आग्नि जाळी तरी न जळे गोपाळु । हृदयी देवकी बाळू म्हणोनिया॥ २॥ अग्नि जाळी तरी न जळती पांडव। हृदयी वासुदेव म्हणोनिया॥३॥ जगमित्र नागा न जळे जरी अग्नि जाळी। हृदयी वनमाळी म्हणोनिया ॥ ४ ॥