भजनी मालिका
← भजनांकडे परत

अगे तूं माउली संतांची साउली । आठवितां घाली प्रेमपान्हा

age tun mauli santanchi sauli | athavitan ghali premapanha

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अगे तूं माउली संतांची साउली । आठवितां घाली प्रेमपान्हा ॥१॥ प्रेमपान्हा पाजी अगे माझे आई । विठाई गे मायी वोरसोनी ॥२॥ येतों काकुळती प्रेम पान्ह्यासाठीं । उभा तो धुर्जटी मागें पुढें ॥३॥ नामा म्हणे जीवें करीन लिंबलोण । ओवाळिन चरण विटेसहित ॥४॥