भजनी मालिका
← भजनांकडे परत

आधींच मी लटिका वरी लटिकी तुझी माया । ऐसें हें कासया पाहसी देवा

adhinch mi latika vari latiki tujhi maya | aisen hen kasaya pahasi deva

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आधींच मी लटिका वरी लटिकी तुझी माया । ऐसें हें कासया पाहसी देवा ॥१॥ जाणतां नेणतां नाम तुझें देवा । गाईन केशवा आवडीनें ॥२॥ विषयीं आसक्त भ्रांत माझें मन । कैसें तुझें भजन घडेल मज ॥३॥ नामा म्हणे आतां जाणसी तें करीं । पतितपावन हरि नाम तुझें ॥४॥