भजनी मालिका
← भजनांकडे परत

आधीं रचिली पंढरी । मग वैकुंठ नगरी

adhin rachili pandhari | mag vaikunth nagari

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आधीं रचिली पंढरी । मग वैकुंठ नगरी ॥१॥ जेव्हां नव्हतें चराचर । तैं होतें पंढरपुर ॥२॥ जेव्हां नव्हती गोदा गंगा । तेव्हां होती चंद्रभागा ॥३॥ चंद्रभागेचे तटीं । धन्य पंढरी गोमटी ॥४॥ नासिलीया भूमंडळ । उरे पंढरीमंडळ ॥५॥ असे सुदर्श-नावरी । ह्मणूनि अविनाश पंढरी ॥६॥ नामा ह्मणे बा श्रीहरी । ते म्यां देखिली पंढरी ॥७॥