भजनी मालिका
← भजनांकडे परत

आधीं चैतन्य अपैतें करोनी । मग संचरे तारुण्य वनीं

adhin chaitanya apaiten karoni | mag sanchare tarunya vanin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आधीं चैतन्य अपैतें करोनी । मग संचरे तारुण्य वनीं । कामक्रोध तुज देखोनी । जाती पळोनी बारा वाटा ॥१॥ तुज पाठीं कवण धांवे । कवण टाकी कवण पावे । कामक्रोधें जग मोहावें । कासयासी खोवावें पोटीं पाय ॥२॥ माया मोहजाळ तुटेल । पळेल पां काळ व्याळ । कां रे स्मरसी ना गोपाळ । मिथ्या ब्याकुळ कांजेविण ॥३॥ बैराग्य दृढ होई निरुता । कासया भितोसी चपेटघाता । परस्त्री तितुकी मानी माता । विषयीं निमित्या आल्यासाठीं ॥४॥ धर्माचेनी मार्गें निघाला कर्ण । शिबी चक्रवर्ती जाला जीवित्वहीन । तयामाजीं सांग नाडला कोण । लटकी झकवण कां बोलती ॥५॥ इंद्रिया गोड तें आरोगिजे । मग धनीवरी धावा पोखरिजे । काय सांगूं शहाणपण तुझें । खेचर विसा म्हणे अरे नामया ॥६॥