भजनी मालिका
← भजनांकडे परत

अधरींचें अमृत सेविसी एकलारे । काय पुण्य केलें रे नेणों पावया

adharinchen amrut sevisi ekalare | kay punya kelen re nenon pavaya

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अधरींचें अमृत सेविसी एकलारे । काय पुण्य केलें रे नेणों पावया ॥१॥ तुळशीच्या माळा शोभति गोपाळा । तयाहूनि आगळा पावया तूं ॥२॥ सोळासहस्र गोपी बोलतील प्रौढी । अधरींची गोडी नेली तुवां ॥३॥ विष्णुदास नामा केशवीं सौरस । उद्धरिला वंश पावया तुवां ॥४॥