भजनी मालिका
← भजनांकडे परत

आचमन करुनि आले सिद्धेश्वरा । हरि ऋषीश्वरा आर्जविती

achaman karuni ale siddheshvara | hari rushishvara arjaviti

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आचमन करुनि आले सिद्धेश्वरा । हरि ऋषीश्वरा आर्जविती ॥१॥ निवृत्ति मुक्ताईला त्यागूं नये कोणी । आतां उत्तरायणीं गमन करूं ॥२॥ पांच दिवस उत्सव केला चांगदेवा । विश्वाचा विसावाअ श्रीहरी ॥३॥ वैष्णवांनीं समाधि बांधली साजिरी । सुवर्णाचा वरी पिंपळ तो ॥४॥ केला नमस्कार वैष्णवांनी जेव्हां । मुक्ताई तेव्हां वोसंडली ॥५॥ नामा म्हणे देवा तीर्थक्षेत्र चांगलें । चित्त मन रंगलें चांगयाचे ॥६॥