भजनी मालिका
← भजनांकडे परत

अभिमानें घाला घातला आह्मांसी । म्हणून लपलासी देवराया

abhimanen ghala ghatala ahmansi | mhanun lapalasi devaraya

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अभिमानें घाला घातला आह्मांसी । म्हणून लपलासी देवराया ॥१॥ तुजवांचोनियां जाऊं पाहे प्राण । दाखवी वदन एक वेळा ॥२॥ मुकुट कुंडलें श्रीमुख सांवळें । केशरी लविलें गंध भाळीं ॥३॥ पाहोनियां जीवीं होय फार मुख । हरेल ही भूक डोळियांची ॥४॥ तुजवांचोनी आम्हां नाहीं कोणी । तिहीं त्रिभुवनीं नामा म्हणे ॥५॥