भजनी मालिका
← भजनांकडे परत

अभक्ताचे स्थळीं भ्रांताची संगती । परदारा चित्तीं परनिंदा

abhaktache sthalin bhrantachi sangati | paradara chittin paraninda

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अभक्ताचे स्थळीं भ्रांताची संगती । परदारा चित्तीं परनिंदा ॥१॥ नेणे भूतदया शांतीचे लक्षण । कार्या कारन बोलतरे ॥२॥ हरिचिया दासा करिती मत्सर । करी निरतर द्वेषबुद्धि ॥३॥ नामा ह्मणे व्यर्थ पेटला पर्वत । नेणे अपघात स्वयें पावें ॥४॥