भजनी मालिका

भजने

अजानवृक्षांची पानें जाण । जो भक्षून करील अनुष्ठान । त्यासी साध्य होईल ज्ञान । येथें संशय नाहीं ॥१॥ ज्ञानेश्वरी तीन सप्तकें । जो श्रवण करील विवेकें । तो होय ज्ञानी अधिकें । येथें संशय नाहीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अजीव शिव व्यापुनी राहिला वेगळा । परब्रह्मा पुरळा विटेवरी ॥१॥ तयाचिये पायीं वेधलें मन । झाले समाधान पाहतां रुप ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अज्ञान बालक कोमाईलें झणीं । जाणे ते जननी तानभूक ॥१॥ तैसा मजलागीं होउनि कृपाळ । करी गा संभाळ अनाथाचा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

अज्ञान बांळंक तुझा प्रल्हाद धांवा करितां । आणि त्रिभुवन देवता नाभीं नाभींरे आतां । माझा प्रर्‍हादु असे वो केउता । तो कवणें पां गांजिला ॥१॥

रचनाकार: संत नामदेव

अज्ञानबाळकें तुझा हाकारा केला । तेणें तये वेळां स्वर्ग भेदिला । ऐकूनि तो धाविन्नला । अवो देवी खेचरे ॥१॥ स्तंभीं प्रगटलीसे हाक । कापिन्नले तिन्हिं लोक । भेणें पळती शंखा – दिक । आणि कैलास आंदोळले ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती । तयाचिये मती बोध कैंचा ॥१॥ अज्ञानाची पूजा कामिक भावना । तयाचिया ध्याना देव कैंचा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

अज्ञानीं विश्वासें साधून्सी वंदी । ज्ञानिया तो सदा तया निंदी ॥१॥ ऐशी उभयतांचि क्रिया । पाहतां चर्या एकची ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अझुनि कां थीर पोरा न म्हणसी किर । धरुनियां धीर लाजे बुर निघाला ॥१॥ मोकळा होतासि कां रे पडिलासि डाई । वरीलांचा भार आतां उतरेसा नाहीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

अट्टाहास शब्द करुनि कांता रडे । आहा मज येवढें बाळ होतें ॥१॥ जळो तें भजन आपुलेनि हातें । बाळ मृत्तिकेंत तुडविलें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अठ्ठाविस युगें उभा विटेवरी । मुद्रा अगोचरीं लावूनियां ॥१॥ ध्यान विसर्जन केधवां करिसी । नेणवे कोणासी ब्रह्मादिकां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

अठ्ठावीस युगें उभा ठेला द्बारीं । पुंडलीकावरी ठेवुनि लक्ष ॥१॥ कृपेचा सागर भक्तजनवत्सल । आमुचा विठ्ठल माय- बाप ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

अडखळूनि पडसी घालूं नको जोडा । धांवत दुडदुडां येईं आतां ॥१॥ बैसावयासाठीं घेऊं नको घोडा । धांवत दुडदुडां

रचनाकार: संत नामदेव

अढळ वैराग्य प्रगटे अंगीं । बसतां संगीं संतांचिया ॥१॥ दिव्य भोगीं विटे मन । मृतिकेसमान सोनें रुपें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

अणिमादि सिद्धि जयाचिया दासी । उणें तयापासीं काय आहे ॥१॥ आणिकाचे द्वारीं सांडोवा पैं होसी । धिग्‍ धिग्‍ न लाजसी असे जना ॥२॥

रचनाकार: संत नामदेव