भजनी मालिका
← भजनांकडे परत

अजीव शिव व्यापुनी राहिला वेगळा । परब्रह्मा पुरळा विटेवरी

ajiv shiv vyapuni rahila vegala | parabrahma purala vitevari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अजीव शिव व्यापुनी राहिला वेगळा । परब्रह्मा पुरळा विटेवरी ॥१॥ तयाचिये पायीं वेधलें मन । झाले समाधान पाहतां रुप ॥२॥ विश्रांती समाधि लोपोनियां ठेली । पाहतां सांवळा मूर्ती देखा ॥३॥ एका जनार्दनीं सर्वां वेगळा तो । बाळलीला खेळे कृष्ण ॥४॥