भजनी मालिका
← भजनांकडे परत

अट्टाहास शब्द करुनि कांता रडे । आहा मज येवढें बाळ होतें

attahas shabda karuni kanta rade | aha maj yevadhen bal hoten

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अट्टाहास शब्द करुनि कांता रडे । आहा मज येवढें बाळ होतें ॥१॥ जळो तें भजन आपुलेनि हातें । बाळ मृत्तिकेंत तुडविलें ॥२॥ ऐकोनियां शब्द जाहला पैं सावध । एका जनार्दनीं क्रोध आला मनीं ॥३॥