भजनी मालिका

भजने

आमुचा आचार आमुचा विचार । सर्वभावें निर्धार जनार्दन ॥१॥ आमुचा दानधर्म यज्ञ तें हवनक । सर्व जनार्दन एकरुप ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आमुचा आम्ही केला भावबळी । भावें वनमाळी आकळीला ॥१॥ भावचि कारण भावचि कारण । भावें देव शरण भाविकासी ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

आमुचा जिवलग सांगती । जन्मोजन्मींचा श्रीपती । एकीसवें एकी बोलती । आणि आळंगिती हदयेसीं ॥१॥ नाना परीच्या विनोदवार्ता । सांगाती बोलती अनंता । तुझेनि भाग्यें भाग्यवंता । म्हणती आम्ही संसारी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

आमुचा नामा तुज गोला निरवुसी । मी तुजवांचोनी नेणें कवणा ॥१॥ कायाबाचामनें जोडिलें जें बापें । तें दिधलें तुज पैंठवावया ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

आमुचा बाप आम्हां सांगे । भाक दिघली पांडुरंगें ॥१॥ तुम्हां न विसंबे सर्वथा । तुमचा भार माझ्या माथां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

आमुचा विनोद तें जगा मरण । करिती भावहीण देखोवेखीं ॥१॥ न कळे सतंत हिताचा विचार । तों हे दारोदार खाती फेरे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आमुचिया भावें तुज देवपण । तें कां विसरोन राहिलासी ॥१॥ समर्थासी नाहीं उपकारस्मरण । दिल्या आठवण वांचोनियां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आमुचिये कुळीं दैवत सदगुरु। आम्हांसी आधारु पाडुरंग ॥१॥ सदगुरु आमुची माता सदगुरु तो पिता । सदगुरु तो भ्राता आम्हालांगीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आमुची कृपाळू तूं होसी माउली । विठ्ठले साउली शरणागता ॥१॥ प्रेमपान्हा स्तनीं सदा सर्वकाळ । दृष्टि हे निर्मळ अमृताची ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आमुची जिवलगे सज्जन सोयरी । नांदतील तिरी भिंवरेच्या ॥१॥ तीच माझ्या चित्ती वसती दिवसराती । भेटावया खंती वाटतसे ॥धृ ॥.

रचनाकार: संत तुकाराम