भजनी मालिका
← भजनांकडे परत

आमुचा विनोद तें जगा मरण । करिती भावहीण देखोवेखीं

amucha vinod ten jaga maran | kariti bhavahin dekhovekhin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आमुचा विनोद तें जगा मरण । करिती भावहीण देखोवेखीं ॥१॥ न कळे सतंत हिताचा विचार । तों हे दारोदार खाती फेरे ॥ध्रु.॥ वंदिलें वंदावें निंदिलें निंदावें । एक गेलें जावें त्याचि वाटा ॥२॥ तुका म्हणे कोणी नाइके सांगतां । होती यमदूता वरपडे ॥३॥