भजनी मालिका

भजने

रमेच्या वल्लभें देखियेलें कंसा । धरोनी आवेशा बैसलासे ॥१॥ त्वरें जाऊनियां धरीयेला केशीं । पाडियेला भूमिसी दुष्टबुद्धी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

रवि दीप हीरा दाविती देखणे । अदृश्य दर्षने संतांचीया ॥१॥ त्यांचा महिमा काय वर्णु मी पामर । न कळे तो साचार ब्रह्मादिकां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

रवीचा प्रकाश । तोचि निशी घडे नाश । जाल्या बहुवस । तरि त्या काय दीपिका ॥१॥ आतां हाचि वसी जीवीं । माझे अंतरी गोसावीं । होऊं येती ठावीं । काय वर्में त्याच्यानें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

रसने रसभोग्य रसाचा भोक्ता रस ग्रासी होय भेटी । रसस्वादाचा सौरसु तोची ब्रह्मारसो कृष्णीं पडतसे गांठीं ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ

रसातळां जातां अवनी । घेतलें वराहरुप चक्रपाणी ॥१॥ तोचि महाराज पुंडलिकासाठीं । कर ठेऊनी कटीं उभा विटे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

राईयेवढें पांखरूं त्रिभुवनीं त्याचा फेरारे । नर आणि नारी तया पांखराचा चारारे । पिंडामध्यें आहे त्याचा शोध तुझी करारे । मेरूच्या शिखरीं त्या पांखराचा थारारे ॥१॥

रचनाकार: संत नामदेव

राउळासी जातां त्रास मानी मोठा । बैसतो चोहोटां आदरेशीं ॥१॥ न करी स्नान संध्या न म्हणे रामराम । गुरुगुडीचे प्रेम अहर्नीशी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

राखीत गोधनें भक्ताचियां काजा । उणीव सहजा येवो नेदी ॥१॥ आपुलें थोरपणा सारुनी परतें । भक्तांचे आरुतें काम करी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ